Thursday, 2 March 2017

दोन पर्फेक्शानिस्ट आणि एक आवाहन -- तिरकी रेघ - संजय पवार

दोन पर्फेक्शानिस्ट आणि एक आवाहन

Sunday, April 13, 2014

 'आमची सुनीता 'परफेक्शनिस्टआहे,' असं पुलं जेव्हापासून जाहीरपणे म्हणायला लागलेतेव्हापासून पांढरपेशा मध्यमवर्गीयांत या विशेषणाला विशेष जागा मिळाली.त्यानंतर जागतिकीकरणाच्या पसाऱ्यात सरकारी-निमसरकारी नोकऱ्या कमी होऊन व्यक्तिगत नैपुण्याला महत्त्व देऊन 'करारपद्धतीचे 'जॉब्ससुरू झालेतेव्हापासून'परफेक्शनिस्टया शब्दाला वेगळेच वलय प्राप्त झाले.
पुलंकडे राबता खूप लोकांचामग ऐनवेळी वसंता (देशपांडेकिंवा कुमार (गंधर्व)आले की त्यांच्या जेवणापासून साऱ्या व्यवस्था सुनीताबाई कशा तत्पर आणि नियोजनबद्ध पद्धतीने करत. (उदाजास्तीचे दूध मागवणेनाश्ताजेवणाच्या वेळा सांभाळणेआणि प्रसंगी शिस्त म्हणून एखादी गोष्ट निग्रहाने नाकारणे.) आता सर्वसाधारण घरातली सर्वसाधारण स्त्री हीसुद्धा या गोष्टी सहज म्हणून करतेपण ती सुनीता देशपांडे नसल्याने 'परफेक्शनिस्टम्हणून नावाजली जात नाहीमोठय़ांचं सगळंच मोठं आणि मोठय़ांचं छोटंही मोठंच!
सांगायचा मुद्दा हाकी रस्त्यावर भेळेची गाडी लावणारा अथवा चार स्टीलच्या डब्यांतून नाश्ता विकणारा कोणीते डबेप्लेटकचरापेटी यांचं एक मिनिएचर त्याने असं केलेलं असतंकी कोणताही फाफटपसारा न मांडता तो त्या तीन फुटांच्या जागेत परफेक्ट व्यवसाय करतोअगदी सायकलवर चहा विकणाराही यात येतोपण अशा परफेक्शनिस्टांची नोंद होत नाही.
मात्रएखाद्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवून मोठे झालेलेअनेक विक्रम नावावर असलेले,लोकांच्या गळ्यातले ताईत बनलेले कुणी या सगळ्या उपर 'परफेक्शनिस्टअसतील,तर मग ते हिमालयातले 'एव्हरेस्ट'ते 'सुमरमॅनठरतातते श्वाससुद्धा परफेक्ट लयीत आणि पापण्यांची उघडझापही परफेक्ट टायमिंगमध्ये करत असावेत असेच सर्वाना वाटतेजगात सगळ्यात शक्तिमान एक शक्ती आहेअसं न मानणाऱ्या आमच्यासारख्या नतद्रष्टांना अशा परफेक्शनिस्टांतही मग खोट दिसली नाही तरच नवलसर्वाचा रोष पत्करून हे बोट ठेवणे आम्हाला आमचे कर्तव्य वाटतेआणि आम्ही बोट ठेवलेल्या जागेसंबंधी त्यांनी विचार करून कृती केली तर ते अधिक परफेक्ट होतील.. त्यासाठीच हे आवाहन.
यातला पहिला 'परफेक्शनिस्टआहे सर्वात तरुण भारतरत्नविक्रमादित्य सचिन तेंडुलकरविक्रमांचे हिमालयआल्पस् निर्माण करून नुकताच तो निवृत्त झालाय.
पांढऱ्या कपडय़ांतील 'जंटलमनस् गेम' (कारण ब्रिटिशांचे अपत्य!) असलेल्या क्रिकेटमध्ये 'सुनील गावसकरनंतर कोण?' हा 'नेहरूंनंतर कोण?'एवढाच मोठा प्रश्न होतापण त्याचे उत्तर गावसकरनाच माहीत होतंशिरीष कणेकरांच्या स्टॅण्डअप् कॉमेडी कार्यक्रमासाठी कणेकरांनी गावसकरना निमंत्रण दिले तेव्हा ते म्हणाले, 'माझ्याऐवजी तेंडल्याला बोलवतो पुढचा हीरो आहे.अशी आठवण कणेकरांचं लेखन वाचताना वाचल्याचं आठवते.
यथावकाश 'तेंडल्या'ने १० नंबरच्या जर्सीसह क्रिकेटमधलं अढळ ध्रुवताऱ्यासारखं लखलखीत यश मिळवलंसचिन तेंडुलकर हा क्रिकेटच नाहीतर एकूणच विनम्र व्यक्तिमत्त्वाचा आयकॉन ठरलानिवृत्त होताना त्याने केलेलं भाषणही उत्कृष्ट'निरोपा'चा नमुना म्हणून ऐतिहासिक नोंदीत राहील'भारतरत्नत्याला नियम बदलून किंवा नवा नियम करून दिलं गेलंत्यावरही ध्यानचंदखाशाबा जाधव असे ज्येष्ठतेचे मुद्दे उपस्थित झालेते सोडता समस्त भारतीयांनी ते आनंदानेअभिमानाने सरकारतर्फे देऊ केले-राजकीय व्यक्तीला 'भारतरत्नदेण्यासाठी सरकारवर एवढा दबाव कधीच आला नसेल.
मात्रसाध्या प्राध्यापकाच्या घरात जन्माला आलेल्यादेशी मराठी प्रशिक्षकाकडे क्रिकेटचे धडे घेतलेल्या या परफेक्शनिस्टने इतकं सारं घेऊन झाल्यावर देण्याची वेळ आलीय असं वाटतंक्रिकेटमधला प्रत्येक क्षण त्याचा स्वत:चा आहेत्याची मेहनत,त्याची एकाग्रता याचं ते फळ आहेत्यावर त्याचा आणि त्याचाच हक्क आहेपण सचिन खेळायला लागल्यापासून ते निवृत्त होईपर्यंत क्रिकेट आमूलाग्र बदललंपांढऱ्या कपडय़ातली पाच दिवसांची कसोटी जाऊन रंगीत कपडय़ांतलं ५० षटकांचं क्रिकेट आलंसूर्यप्रकाशातच खेळला जाणारा हा खेळ कृत्रिम प्रकाशात रात्रीही रंगू लागला.चेंडूचा 'पोस्ट ऑफिस रेडरंग जाऊन तो पांढरानिळा झालासामने वाढलेदौरे वाढले१२ महिने २४ तास क्रिकेट खेळलं जाऊ लागलं. टी-२०आयपीएल म्हणजे एक आकडी लॉटरीसारखा जुगारचक्रिकेटला घोडय़ाच्या शर्यतीपेक्षाही अधिक करमणुकीचं आणि सट्टेबाजीचं स्वरूप आलंमॅच फिक्सिंगने त्यात गुन्हेगारीचाही प्रवेश झालात्यातले दोषी आजही उजळ माथ्याने फिरताहेत.
हे सर्व सचिन क्रिकेट खेळत असतानाच आजूबाजूला घडत होतंपण सचिन 'मी बरा.. माझा खेळ बराया भूमिकेतून कशावरही भाष्य करत नव्हताम्हणजे त्यावेळी तो क्रिकेटमधला मनमोहन सिंग किंवा एकेअँटोनी होता!
पण आता तो निवृत्त झालायआता त्याला एकाग्रतेची जरुरी नाहीखेळावर लक्ष ठेवायची गरज नाहीमग आयपीएलश्रीनिवासनमयप्पन याबद्दल कधी बोलणार तोनिवृत्त झाल्यावर तो आज कुठे या दुकानाचं उद्घाटन करस्वत:चं चांदीचं नाणं वितरीत करलोकांच्या वाटेत येणारं स्वत:च्या विक्रमाचं शिल्प खुलं कर.. यातच रमलायमुद्दा असा आहे-खेळातील निवृत्तीआधीच काँग्रेसच्या पाठिंब्याने राज्यसभा सदस्य झालेल्या सचिनची या सरकारबद्दल भावना कायज्या राजीव शुक्लांनी त्याला ही सदस्यता देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलीत्या शुक्लांनी मुंबईत मोक्याचा भूखंड लाटला होता.
राज्यसभा सदस्य म्हणजे सन्मानार्थ काढलेला पोस्टाचा स्टॅम्प नव्हेराज्यसभासदस्य म्हणून काय करणारहे त्याने जाहीर करावं'सचिन अगदी आजही 'इनोसंट'आहेवाटतो!म्हणणाऱ्यांना हा 'इनोसंट बॉयफेरारीवरचा टॅक्स आणि बांद्रय़ातल्या घराला स्पेशल परवानगी मागताना 'मॅच्युअरहोतोहे दिसत नाहीकॅन्सरग्रस्त मुलांना भेटून आनंद देणारामुलींच्या शिक्षणाला हातभार लावणारा सचिन मुंबईतील'मैदाने वाचवामोहिमेचा सूत्रधारब्रँड अ‍ॅम्बेसिडर का होत नाहीपरळनायगाववरळी,गिरगावगोरेगावसायनधारावी इथल्या क्रिकेटवेडय़ा गरीब मुलांमधला क्रिकेटर शोधण्यासाठी सचिन काही योजना का हाती घेत नाहीत्याला त्याचे 'बांद्रा ते दादर'दिवस आठवत नाहीतकी आता पंचतारांकित बीकेसीमध्ये अर्जुनसोबत सराव एवढंच त्याचं लक्ष्य आहेसिगरेटदारूच्या जाहिरातीला नकार देणारा सचिन महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातलं पाणी बेसुमार उपसणाऱ्या कोल्ड्रिंकची जाहिरात मात्र करतो.तहानलेला महाराष्ट्र काय पेप्सीने तहान भागवणारसर्वात भ्रष्ट अशा आयपीएलच्या जुगारात या विक्रमादित्याला एक उद्योगपती काही कोटींना खरेदी करू शकतो?त्याच्या खाजगी कार्यक्रमांना मग अनिवार्य उपस्थिती म्हणून तो जातोसिगरेट/दारूच्या जाहिरातीसारखं आयपीएलला नाही म्हणण्याचं धैर्य सचिनसारख्या खेळाडूंनी दाखवलं असतं तर आज ललित मोदीश्रीनिवासनमयप्पनशिल्पा शेट्टी,प्रीती झिंटा असल्या कथलांना सोन्याचा भाव आला नसताराज्यसभा सदस्य म्हणून इतर खेळांप्रती असलेली सरकारी अनास्था दूर करून त्यांना प्रायोजक मिळवून देण्यासाठी सचिन काही करेलकी स्वत:साठी प्रायव्हेट गोल्फ क्लब शोधेल? 'अर्जुनला साधी वागणूक द्याअसं पत्रकारांना सांगणारा सचिन स्वतत्याला टीम इंडियाच्या नेट प्रॅक्टिसमध्ये मग का घेऊन जात असे?क्रिकेटमधल्या देवानं आता मनुष्यावतार घ्यावा व घडाघडा बोलावंमेंबर ऑफ पार्लमेंट (सीनिअर हाऊसम्हणून गाऱ्हाणी मांडावीतखेळांचं धोरणसंधीव्यवस्था,निधी यासाठी बोलावंप्रत्यक्ष काम करावंनिवृत्तीनंतर त्याने महाराष्ट्रभारत बघावा.भारताला ऑलिम्पिकपासून सर्व स्तरांच्या जागतिक खेळांत पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेतहॉकीफुटबॉल यांनाही राजकारणमुक्त करावंथोडक्यातबांद्रा ते प्रभुकुंज आणि प्रभुकुंज ते कृष्णकुंज याच्या पलीकडेही दुनिया आहेहे सचिन रमेश तेंडुलकर या भारतरत्नाने लक्षात घ्यावे.
यानंतर आपले दुसरे परफेक्शनिस्ट अभिनेते आमीर खानत्यांनीही असाच आपला दबदबा तयार केलायशिवाय सामाजिक जाणिवेचं अस्तरत्यामुळे इतर 'खान'मंडळींपेक्षा आपण वेगळे 'खानदानी'- ही ओळख तयार करण्यात यशस्वी झालेलं व्यक्तिमत्त्व'सत्यमेव जयते'मधून छोटय़ा पडद्यावरील त्यांचं आगमनही 'सामाजिक भानजाणीव असलेलाम्हणून आदराने स्वीकारलं गेलं. सत्यमेव जयतेचं पहिलं पर्व लोकांनी स्वीकारलंत्यांना ते आवडलंत्यातली काही तथ्ये धक्कादायक होतीमात्र,कार्यक्रमाचं स्वरूपदर्जा उत्तम होता.


दुसऱ्या पर्वाच्या जाहिराती सुरू झाल्या आणि वाटलं, 'मिपरफेक्शनिस्टयांचा अहं जरा वाढलायसर्वच प्रोमोजाहिरातींत'बघा मी कसा..', किंवा 'मी दाखवतो..' 'तुम्हारे संडे बर्बाद करने आ रहा हूँ..वगैरे जरा 'टू मचहोतंतसं तर वृत्तवाहिन्या आल्यापासून अशा अनेक प्रश्नांना वाचा फुटल्यातआयबीएन लोकमतचा रिपोर्ताज,एबीपी माझाचे स्पेशल रिपोर्टस्झी चोवीस तासचा 'माझा जिल्हाकार्यक्रम हेच दाखवतातशिवाय हिंदीइंग्रजी वाहिन्यांनीही असे प्रश्नमाणसं दाखवलीतत्यामुळे परफेक्शनिस्टचा हा टेंभा खटकलाच.
आमचा मुद्दा वेगळाच आहेस्त्रियादलितहॉस्पिटलकचरापोलीसराजकीय पक्ष,विचारअमुक कायदेलोकपाल वगैरेसिटीजन चार्टर वगैरे सगळं ठीक मिआमीर खानपण संपूर्ण देशाची ४७ साली भौगोलिक आणि ९२ साली मानसिक फाळणी झाल्यानंतर मुस्लीम समाजाबद्दल जी भावना इतर समूह व समुदायांत आहेत्याला कधी वाचा फोडणारमुस्लीम तरुणांना देशद्रोहीअतिरेकी म्हणून का पाहिलं जातं?मदरशांत काय चालतंमुख्य प्रवाहात मुस्लीम तरुणांना का आणलं जात नाहीका त्यांना असुरक्षित वाटतंका त्यांना धर्माधता आकर्षित करतेयावर का नाही त्यांना बोलते करतमुस्लीम धर्मातील अंधश्रद्धारूढी यावर कधी बोलणारदलित मुस्लिमांचं कायमुस्लीम महिलांना पुन्हा अनेक शतके मागे नेणाऱ्या शहाबानो प्रकरणापासून इशरत जहाँपर्यंत नेमकं काय घडलंजावेद फावडाचं काय झालंगावपातळीपासून विद्यापीठ स्तरापर्यंत 'इस्लामी जिहाद'साठी पेटवणारे नेमके कोण आहेतका ते असं करतातआरएसएसची जर झाडाझडती होऊ शकतेतर यांची का नाहीअझरुद्दीनला फिक्सिंग प्रकरणी दोषी ठरल्यावर आपण 'अल्पसंख्यअसल्याची जाणीव का होते?गुजरात दंगलीबाबत भाष्य केल्यावर मिखान तुमचे चित्रपट तिथे वितरित करण्यास नकार देण्यात आलाया अघोषित सेन्सॉरशिपबद्दल कधी बोलणार? 'गुजरात दंगलीबाबत मोदींना कोर्टानं क्लीन चीट दिली आहे..असं आता शरद पवारही म्हणताहेतमग राजनाथसिंह 'आमच्याकडून काही चुकत असेल तर माफ कराअसं का म्हणतातकाय चुकीचं केलं त्यांनीविचारणार त्यांना मिपरफेक्शनिस्ट?तलाकपीडित मुस्लीम स्त्रियांसाठीसमाजप्रबोधनासाठी मुस्लीम सत्यशोधक आज कितीतरी वर्षे काम करतंयसय्यदभाईराजन अन्वरताहेर पूनावाला.. कितीतरी जणांनी समाजाविरोधातरूढींविरोधात उभं राहण्याचं जे धारिष्टय़ दाखवलंते दाखवतील मिआमीर खान२०१३ सालीही चिपळूणजवळील हमीद दलवाईंच्या घराजवळून ग्रंथदिंडी काढायला विरोध होत असेल तर शबानाजावेदआमीरराहुल बोसनंदिता दास यांच्या चॅनेलीय,पेज थ्री किंवा पंचतारांकित सेमिनारची नाहीतर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरायची गरज आहे!
परफेक्शनिस्ट आमीर खानआपण ज्या समाजातून आला त्या समाजाची आर्थिक,सामाजिकशैक्षणिकधार्मिकक्रीडासांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत दयनीय अवस्था आहेएखाद्याच शाहरुखची 'मन्नतपुरी होतेएखादाच आमीर 'अमीरहोतोएखादीच शबाना कैफीच्या पोटी जन्मतेदलित आणि मुस्लिमांच्या व्होट बँका का तयार होतातका त्यांना गृहीत धरले जातेका त्यांचे कळप होतात?या अशा प्रश्नांसाठी आणि त्यांच्या उत्तरासाठी आम्ही पाच नाही५२ रविवार बर्बाद करायला तयार आहोतलेकिन ऐसा प्रोग्रामशो बनाओगे तुमहै हिंमतसत्य कटू असतं याची प्रचीती घरापासूनही येऊ दे परफेक्शनिस्ट मिआमीर खान.
शेवटची सरळ रेघ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शेवटच्या आजारपणात तळलेले वडे दिले जात होते असा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केलाते ऐकल्यावर उभ्या महाराष्ट्राला 'वडापावनावाचं देशी फास्ट फूड देणाऱ्या बाळासाहेबांना अखेरच्या दिवसांत तेच खायला मिळावंआणि पुतण्याच्या सूपसाठी मान हलवावी लागलीहे प्रश्न पडतातयावर त्या प्रसिद्ध 'चढता सूरजया कव्वालीतील काही ओळी आठवतात.
साँस टूटते ही सब रिश्ते टूट जाएँगे
बापमाँबहनबीवीबच्चे छूट जाएँगे
तेरे जितने है भाई वक्त का चलन देंगे
छिनकर तेरी दौलत दो ही गज कफन देंगे..  

No comments:

Post a Comment