खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!
‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ ही भालचंद्र नेमाडे यांची अलिकडेच प्रकाशित झालेली बहुचर्चित कादंबरी. खंडेराव हा या कादंबरीचा नायक. या नायकाच्या आत्मसंवादातून लेखकाने भूत आणि वर्तमानातील माणसाच्या जगण्याचा मोठा पट मांडला आहे. मोठा आवाका असलेली अशी कादंबरी मराठीत दुर्मिळच. साहजिकच कौतुक, वाद, टीका असं सारं काही या कादंबरीच्या बाबतीत होत आहे. राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर यांनी केलेली या कादंबरीची चिकित्सा.
नेमाड्यांचा खंडेराव मोरगावातल्या जातिव्यवस्थेकडे बहुश: एक आडवी व्यवस्था म्हणून पाहतो. (जाता जाता : पान ५४४-५४५ वर खंडेराव आपली भूमिका आक्रमकपणे मांडण्यासाठी एक महावात्रट भाषण करून त्यात सर्व ‘उभ्या’ गोष्टींची यथेच्छ टवाळी करतो. त्याच भूमिकेतून तर तो उभी जातिव्यवस्था आडवी मानून चालत नसेल ना?) जातिव्यवस्थेत जातिजातींमध्ये वेगळेपणा आहे, अंतर आहे हे जेवढं खरं, तेवढंच त्या वेगळेपणाला, त्या अंतराला श्रेष्ठ-कनिष्ठत्वाचं, उतरंडीचं अधिष्ठान आहे हेही लक्षात ठेवायला हवं. खंडेरावाचा जातविषयक दृष्टिकोन जास्त करून अनेकवादी (बहुविधवादी, प्लुरालिस्ट) आहे. त्यात नेमक्या ह्या अधिष्ठानाकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे मग जातींचे आपापले सांस्कृतिक संसार, त्या सांस्कृतिक अस्तित्वांचा सुटा गोडवा, गावातली सांस्कृतिक सरमिसळ आणि देवाणघेवाण, सहअस्तित्व, या सगळ्याची लोकगीतं गाणं शक्य होतं. पण मतलबाची गोष्ट असते ती उतरंडीची. तिच्याबद्दल खंडेराव बोलत नाही. उलट, त्याची गोष्ट देवाणघेवाण आणि सरमिसळ यांच्यावर एवढा भर देते की अन्याय आणि उतरंड या गोष्टी उपर्याद वाटायला लागतात. आणि पुन्हा यात कुठे तरी एक अशीही समजूत आहे, की कुणबी आणि बलुतेदार यांच्यात एकजीव संबंध आहेत- म्हणजे उपरा बांडगुळी (ब्राह्मण, मारवाडी) समाज, उत्पादक (कुणबी व इतर संलग्न बलुतेदार) समाज आणि संकीर्ण सेवक समाज अशी विभागणी क्वचित कुठे डोकावते. तीही कुणबीकेंद्रित आकलनाचाच भाग म्हणायला लागेल. पण या आडव्या पसरलेल्या व्यवस्थेत कोणाचं पक्कं वर्चस्व नाही की समावेशकतेला धूर्त अधिमान्यीकरणाचा स्पर्श झालेला नाही. वर्चस्व, अधिमान्यीकरण, विचारप्रणाली हे सगळं उत्क्रांत आधुनिकतेचं लटांबर. जातिव्यवस्था कशी गोजिरवाणी आडवी पहुडलेली, तिला उत्क्रांतीने उभी केली, असा सगळा आव.
-४-
नेमाड्यांची ही बहुप्रतिक्षित कादंबरी. तशीच ती आता बहुचर्चितही बनेल- तिच्या प्रचंड आवाक्यामुळे आणि समृद्ध अनुभव देण्याच्या ताकदीमुळे ती मराठी वाचकांमध्ये दीर्घकाळपर्यंत वाचली जाईल- कुतूहलाने, चवीने, क्वचित गंभीरपणे आणि अनेक वेळा भक्तिभावानेही. मराठी वाचणाऱ्याला क्वचितच मिळणारा स्तंभित करण्याचा अनुभव ती देत राहील. आपल्या कमअस्सल जगण्याचा गंड असलेल्या शहरी पांढरपेशांमध्ये ‘हिंदू-’ पापक्षालनासाठी वाचली जाईल. त्याउलट, आपल्या अस्सलसदृश जगण्याला प्रतिष्ठा नसल्यामुळे खंतावलेल्या निमशहरी/ग्रामीण वाचकांमध्ये कनिष्ठत्वाच्या क्षणिक भरपाईसाठी ‘हिंदू-’ वाचली जाईल. एकंदरीने, नेमाडेकृत खंडेरावगीता काही काळ मराठी वाचकांमध्ये पारायणली जाईल.

नेमक्या याच कारणासाठी ‘हिंदू-’च्या प्रगट/अप्रगट भूमिकांची उकल करणं आवश्यक बनतं. शहरांपेक्षा गावं अस्सल, उद्योगांपेक्षा शेती अस्सल, या नुसत्या चमकदार आदर्शरमणीय कल्पना नाहीत. आजही आपल्या भोवताली चालणाऱ्या समाजकारणात, संघर्षांत, युक्तिवादांमध्ये अशा भूमिका घेतल्या जातात आणि त्यांना नैतिक उच्चत्वाचा एक पदर असतो. उदात्ततेचा आणि त्यागाचा धागा त्यांच्यामागे असतो. ‘हिंदू-’ ही कादंबरी या घडामोडींचा पुसटही उल्लेख करीत नसली, तरी या सामाजिक वास्तवापासून तोडून खंडेरावाच्या उलघालीचा आणि कृती/आकृतींचा माग निघू शकत नाही.
खंडेरावाचा सगळा वैचारिक आकांत आहे तो जगण्याच्या सार्थकतेविषयीचा. प्रगती नावाच्या गोष्टीबद्दल तो अतोनात साशंक आहे. मनुष्यप्राण्याच्या विवेकावर आणि निर्णयशक्तीवर त्याचा विश्वाबस नाही. त्यापायी तो स्वत:वर मागासपणाचा, सनातनीपणाचा आरोप घ्यायलाही तयार आहे. मानवी स्वेच्छाशक्ती, मानवी हस्तक्षेप यांचा कोणालाच फायदा होत नाही, अशी त्याची भूमिका आहे. अगदी मित्रांमध्येसुद्धा जोडीदार निवडण्याच्या प्रश्नावर खंडेराव धाडकन ‘निवडीच्या थोतांडा’वर तुटून पडतो. त्याची तो ‘शहरी, उच्चवर्गी, भांडवलशाही आणि पाश्चात्त्य व्यक्तिवादी’ एवढ्या शिव्या देऊन संभावना करतो (५२३). त्याचा दोस्त मच्छिंदर त्याला पाठिंबा देत म्हणतो, ‘सनातनी असेल, पण मानवतावादी तर आहेच. आणि नादारांच्या हिताचाही.’
निवड, ती निवड करण्यासाठी पर्याय असण्याचा आग्रह आणि निवड करणाऱ्याची विवेकबुद्धी. खंडेराव या तिन्हींची थोतांड म्हणून वाट लावतो. मानवाचा इतिहास क्रौर्याशिवाय आणखी दुसरं काय सांगतो, असा त्याचा आव्हानात्मक प्रश्न आहे (५१९). संहार हेच माणसाचं संरक्षणाचं हत्यार आहे, असा त्याचा दावा आहे (५४६). परिस्थितीवर मात करण्याचा अहंकार, हे आजच्या मानवी संस्कृतीचं व्यवच्छेदक लक्षण आहे असं त्याला वाटतं. टिकून राहण्याची धडपड ही त्याला असंस्कृत वाटते. ‘प्रत्येकाच्या आयुष्याची कमाई हीच की तो मरतो... कुठल्याही संस्कृतीचा शेवट हाच असतो- एक संपल्याची अतीत फडफड. आपली आजची संस्कृतीही लवकर फडफडो, की सगळं शांत’ (५३३). पण ह्या क्रोधाविरुद्ध शापवाणीच्या जोडीनेच खंडेरावाला जगणं नावाच्या अडगळीतल्या समृद्धपणाची जाणीवही आहे. म्हणून त्याचा खरा प्रश्न ‘कसं जगायचं’ असा आहे. त्याला व्यक्तिवादाचा राग आहे, पण समुदायनिष्ठ जगण्यातली अडगळ तर त्याने आयुष्यभर अनुभवलीच आहे. तत्त्वत: ती अडगळ त्याला खुणावते, सुखावते; पण वडलांच्या मृत्यूनंतर आता त्या अडगळीवर स्वार होऊन जगायचं म्हटल्यावर त्याला हिंदू कुटुंबसंस्थेची गचाळ बाजू दिसायला लागते (५८३) आणि तो सारखं स्वत:ला बजावतो, की इथून निसटायचं बघावं (६०१). तीही निवडच. वैयक्तिक.
खंडेरावाचं जगणं, त्याच्यातले पेच, खंडेरावाची तात्त्विक भूमिका, या सगळ्यात विरोधाभास आहे, गुंता आहे. नेमाडे तो तसाच राहू देतात, सरळसोट कथानक तयार करीत नाहीत. कारण खंडेरावाच्या भूमिकेतील विसंगती आणि तणावांसह त्याच्या भूमिकेतील प्रश्न त्यांना पुढे आणायचे असावेत. उत्क्रांतीविषयीचं खंडेरावाचं वाह्यात भाषण म्हणजे त्याच्या भूमिकेचं एक टोक. माणसाची उत्क्रांती झाली हेच चुकलं, असा हा दावा! गावी परतल्यावर खंडेरावाची चुळबूळ आणि निसटण्याचा प्रयत्न हा व्यवहारात गचाळ असलेल्या नात्यांच्या नित्य जंजाळातून सुटण्याच्या कळत्या वयापासून चाललेल्या खंडेरावाच्या धडपडीचा भाग. म्हणजे समुदायमय जीवनापासून व्यक्ती म्हणून स्वत:ला सुटं करण्याची प्रगत सांस्कृतिक धडपड. आणि कादंबरीच्या शेवटी खंडेरावासाठी चाललेलं गार्हांणं तो तटस्थ-त्रयस्थपणे ऐकतोय- स्वप्नातही: ‘या घराची येल मांडवावरे चढू दे देवाऽ.... थोरल्या बायेच्या पुताच्या उंबरात लेकरं रांगू दे देवाऽ.’ खंडेराव स्वत:ला या अडगळीत अडकू देणार की काय? माणसानं आयुष्य येईल तसं आनंदानं जगत राहावं, ही स्वेच्छापूर्ण पराधीनता ही खंडेरावाच्या वैचारिक आकांताची तिसरी बाजू.

व्यवहाराच्या पातळीवर खंडेरावाला आधुनिक व पारंपरिक यांच्यातलं द्वंद्वात्मक नातं नक्कीच कळत असणार. त्याच्याच गावमित्रांची आणि वर्गमित्रांची उदाहरणं पाहिली तरी खंडेराव त्यांच्या ‘उन्नती’कडे तुच्छतेने पाहत नाही. मच्छिंदरचं फॉरेस्ट ऑफिसर होण्याचं स्वप्न किंवा वानखेडेचं परदेशी शिकायला जाण्याचं स्वप्न यांचा तो अनादर करताना दिसत नाही. गावगाड्याचं गुणगान करीत असतानाही तो रघूला ट्रक ड्रायव्हर व्हायला भरीला घालतो. लोटू न्हाव्याचं ‘लोटूज फायस्टार’ हे तर त्याच्या बैठकीचं ठिकाण. ‘चोर होऊ, दरोडेखोर होऊ, पण हा दारोदार बांगड्या भरायचा फकिरी धंदा नाही करणार’ (३८१) असं जेव्हा डोंगर मण्यार म्हणतो तेव्हा त्याला खंडेरावाचा मूक पाठिंबा असावा असंच वाटतं. आता हे सगळे आधुनिक विश्वांच्या दुष्टचक्रात सापडलेले मित्र. ते त्या आधुनिकातच कुठे अवकाश मिळेल का हे पाहतात, आणि तसं करण्यातली अपरिहार्यताच नव्हे तर निकड खंडेराव समजू शकतो. कारण दारिद्य्र आणि साधेपणा यातला फरक कळण्याएवढी समज त्याला आहे: ‘गरज आणि उणीव यांच्यातला माणुसकीचा फरक’ (१७८).
मंडी ही स्कॉटिश आर्किऑलॉजिस्ट. तिची पुरातत्त्व आणि आजचा समाज या दोन्हींची समज खंडेरावाशी मिळती- जुळतीच आहे. पण ती नवऱ्याला सोडून आली आहे आणि घटस्फोट घेणार आहे. ही निवड आधुनिक विश्वात (निदान आधुनिकपूर्वापेक्षा) जास्त सहज शक्य आहे, ही बाब खंडेरावाने टिपलीच असणार की.
म्हणून खंडेरावाच्या आकांतात पारंपरिक आणि आधुनिक यांचा संवाद नाही, ही फारच मोठी खटकणारी गोष्ट बनते. तो संवाद टाळण्यासाठीच जणू खंडेराव ‘पारंपरिक’ या संकल्पनेला शिवतही नाही. ही सगळी आपल्याच डोक्यातली अडगळ. खंडूचा सगळा राग उत्क्रांती नावाच्या अतिव्याप्त, अमूर्त, सतत चाललेल्या प्रक्रियेबद्दल आणि ती प्रक्रिया नावाजण्याच्या वृत्तीवर आहे. या दृष्टीने ५४४-५४९ या पानांवरचं खंडेरावाचं भाषण नमुनेदार आहे. उत्क्रांतीमुळे मनुष्यप्राणी हिंसक आणि असुरक्षित बनला, उत्क्रांती सर्वनाशी आहे, उत्क्रांतीत माणसाचं शरीर व मेंदू दोन्ही कमकुवत बनताहेत, करुणा आणि प्रेम या भावनाच उत्क्रांतीमुळे आता उत्पन्न होऊ शकत नाहीत... आणि हे थांबवणंही शक्य नाही, असं खंडेराव सांगतो. या सगळ्याकडे आपण अतिशयोक्ती म्हणून दुर्लक्ष करू शकतो. पण त्यानंतर यावरचा उपाय म्हणून खंडेराव जी जीवनपद्धती प्रशंसतो तिचा किंवा तत्सम पद्धतीचा पुरस्कार आजघडीला काही गट/विचार/व्यक्ती तरी करतातच. त्यामुळे खंडेरावाच्या त्या भाषणाला एक निश्चिीत समकालीन आधार आहे हे लक्षात ठेवायला हवं: ‘परिस्थितीशी जास्तीत जास्त जुळवून घेणे आणि आपल्याला आवश्यक असेल तेवढीच परिस्थिती बदलणे...’ (५४८). आधुनिक व पारंपरिक विचारविश्वांमधला फरक इथे लख्खपणे पुढे येतो. अस्सल जगण्यासाठीची ही जीवनदृष्टी. त्यामुळेच बहुधा वडिलांच्या मृत्यूनंतरच्या काळात ‘निसटावंसं’ वाटत असतानाही खंडेराव सर्व रीती, विधी, व्यवहार यांना मख्खपणे सामोरा जातो.
-५-
अस्सल शोधण्यासाठी सारं काही सहन करण्याचा हा मख्खपणा खंडेराव, तुमच्यात कुठून आला?
खंडेराव गावात जे जगला, जे संचित गावातल्या कुचाळक्यांमधून आणि कुटुंबातल्या कहाण्यांमधून त्याच्यापर्यंत पोचलं त्यातून खंडेराव घडला आहे. त्यामुळे हे सगळं त्याच्या भौतिक आणि सांस्कृतिक परिसरातून त्याला मिळालं आहे. त्या परिसराचं नाव आहे ‘हिंदू’ परिसर. या नावाबद्दल खुलासा करून मग पुढे जायला हवं. कारण मुळात नेमाड्यांनी हा सगळा आराखडा मनाशी करून त्याला ‘हिंदू’ हे नाव मुक्रर केलं. त्यानंतर ‘हिंदू’ या कोटीचा सार्वजनिक जीवनातला संदर्भच बदलून गेला. तरीही आपल्या निर्णयाशी- या परिसराला हिंदू म्हणण्याविषयी- नेमाडे ठाम राहिले. यात अर्थातच धोका होता/ आहे. भलत्याच ‘हिंदू’शी नेमाड्यांची ‘हिंदू’ ही कोटी जोडली जायची. नेमाड्यांनाही ताप आणि त्या हिंदूवाल्यांना तर त्याहून ताप.

तर, ‘हिंदू’ या नामचिन्हाला किमान चार संदर्भ गेल्या शतकभरात अस्तित्वात आलेले दिसतात. एक आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘हिंदू’चा. त्याचा किस्सा या कादंबरीत आहेच (३१८-३३१). दुसरा सावरकरी हिंदुत्वाचा. त्याची आणि संघाच्या हिंदुत्वाची कादंबरीत जरा सरमिसळ झाली आहे हा भाग अलाहिदा. पण एके काळी या दोन हिंदुत्वांमधून विस्तव जात नसे. या दोहोंबद्दल खंडेरावाची वृत्ती तिखट नकाराची आहे. त्यामुळे या प्रकारच्या ‘हिंदूं’शी खंडेरावाच्या परिसराचा संबंध आहे तो निव्वळ अपघाती नामसाधर्म्याचा. खंडेराव म्हणतो, ‘... विशाल राष्ट्रीयतेच्या ध्वजाखाली पंचमवर्णीयांची विष्ठा असते...’ (३२०). हे जर ‘त्या’ हिंदूंनी वाचलं तर न जाणो किती शहरांमध्ये नेमाड्यांना पोलिस संरक्षण द्यावं लागेल!
तिसरं ‘हिंदु’पण महात्मा गांधींचं. नवल म्हणजे या कादंबरीत तेही जवळपास अदृश्य आहे. म्हणजे संघाच्या निमित्ताने येतो एखादा उल्लेख तेवढाच. आणि एका बेहद्द कॉमेडी परिच्छेदात सामान्यांचे बापूजी भेटतात- मुन्नाभाईची खानदेशी आवृत्ती (३२९) जणू! हे मोरगावच्या भपाऱ्या पाटलाला उमगलेले गांधी : ‘गांधीजी म्हंता, ... (जिनांना) तूच मुख्य हो सबंध हिंदुस्थानचा.. अरे, भावाभावांचं वैर फार वाईट... भांड्याले भांडं लागतंच... हात जोडतो भौ जिना. तू मोठ्या बापाचा, आम्ही लहान बापाचे! मंग बी झालं?’ पण हे एवढंच. खंडेरावाला आपलं ‘हिंदू’ नामचिन्ह गांधींशी फार जोडावंसं वाटत नाही. चौथं हिंदुपण आहे जे कादंबरीत भरून राहिलं आहे.
जगण्याची समृद्ध अडगळगांधींना पारंपरिक आणि परंपरावादी मानलं जातं. त्यांच्यात हे चौथं हिंदुपण होतंही. पण त्यांना ‘अडगळ’ आवरण्याची थोडी सवय होती. परंपरेनं नशिबी आलेल्या अडगळीतून निवड करून पुढे जाण्याची त्यांची लकब होती. खंडेरावाच्या उग्र पारंपरिकतेत कदाचित ते बसत नसेल. तेव्हा जास्त व्यापक आणि सामान्य अर्थाने प्रचलित एका भू-सांस्कृतिक परिसराला इथे हिंदू म्हटलं आहे.
खंडेराव वावरतो तो या हिंदू परिसरात. त्याच्या अनुभव-विश्वा तला स्थितिवाद- आहे तसं जगण्याचा आग्रह या हिंदुपणातून येतो. खंडेराव ज्या समावेशकतेबद्दल बोलतो तीही याच हिंदुपणातून येते. खंडेरावाला ज्या मांगल्याचा शोध घ्यायचा आहे त्या मांगल्याच्या क्षमताही त्याला हिंदू परिसरात कधी कुठे दिसतात. प्रश्न राहतो एवढाच, की (इतरत्रही असू शकतील तशा) हिंदुपणात(सुद्धा) मांगल्याच्या क्षमता आहेत असं ही कादंबरी म्हणते, की (फक्त) हिंदुपणातच त्या क्षमता आहेत, असा अनन्यभावी किंवा एकमेवाद्वितीयवादी कडवा आग्रह ती धरते? उत्तर अवघड आहे. ‘हिंदू-’ कादंबरीत असा अनन्यभावी आग्रह नाही, असा विश्वास ठेवायला मला आवडेल. पण उत्क्रांतिवादाला मुख्यत: पश्चिीमेकडचे देश कारणीभूत आहेत, असं कादंबरीत सूचित केलं आहे, त्याअर्थी नेमाड्यांना तिथल्या सांस्कृतिक परिसरांविषयी कमी आस्था आणि अपेक्षा असाव्यात अशी शंका येते. ही अस्वस्थ करणारी शंका आहे. कारण सांस्कृतिक परिसरांमध्ये अशी प्रतवारी करणं आत्ममग्नतेला, आत्मप्रौढीला आणि सामुदायिक अहंकाराला खतपाणी घालतं. गांधींच्या हिंदुपणात अशी स्व-परता नाही. आपली संस्कृती तेवढी श्रेष्ठ, असं मानण्याची वृत्ती आपल्या समाजात आहेच. तीच जर या कादंबरीतून अभिव्यक्त होत असेल तर खंडेरावाला शक्यतांच्या रानात सापडलेला पावलाचा एकमात्र ठसासुद्धा (५४९) फसवा ठरला असं म्हणावं लागेल.
नेमाड्यांच्या हिंदुपणाबद्दलची आणखी एक अस्वस्थ करणारी पण आकर्षक वाटणारी गोष्ट म्हणजे तिचं (समृद्ध) अडगळ हे वर्णन. आकर्षक, कारण आपल्या सांस्कृतिक भूत आणि वर्तमानाच्या हिश्शाला अडगळ या कोटीत टाकण्याचं दाखवलेलं धाडस. हे काही राजकीय धाडस नाही, तर आपल्या प्रेयसालासुद्धा तटस्थपणे अडगळ म्हणण्याचं हे धाडस आहे. अस्वस्थता अशासाठी, की लेखक या अडगळीचं तर्कशास्त्र पुरेसं पुढं नेत नाही. खंडेरावाचं आयुष्य- त्याच्या गावकऱ्यांचं, सवंगड्यांचं, नातलगांचं आयुष्य-गतस्मृती, या सगळ्यांमध्ये समृद्धीची (समाधानाची) आणि समर्थनाची दाट छाया आहे. कुठलाच सांस्कृतिक परिसर सहजासहजी मेद झाडून टाकत नाही. त्याला हिंदू सांस्कृतिक परिसरही अपवाद नाही. म्हणून अडगळ साचत जाते. अडगळीचंच रूपक पुढे चालवायचं, तर एके काळी कामाच्या वस्तू पुढे अडगळ बनतात. आणि जर मोठ्या वाड्यात अडगळ साचली तर फारसं बिघडत नाही, पण ‘अस्सल’ बाजूला पडायला वेळ लागत नाही. अशा वेळी गरज असते ती अडगळ धांडोळून अधूनमधून भंगारार्पण करण्याची. हेच नेमकं खंडेराव करीत नाही. तो घुसमटतो, चरफडतो, चेमटून जातो; पण अडगळीला हात काही लावत नाही.
हिंदू सांस्कृतिक परिसराच्या श्रेष्ठत्वाचं सूचन हे जर नेमाड्यांचं या कादंबरीतलं एक कथन असेल, तर त्या परिसराच्या चिकित्सेतली हयगय हे त्यांचं दुसरं कथन म्हणावं लागेल. ती चिकित्सा त्यांनी सुरू करून दिली असती तर त्यांना अभिप्रेत असलेल्या अस्सलपणाच्या शोधाची चर्चा मराठीत नव्या दमाने सुरू झाली असती. ते काही होत नाही. खंडेराव, जरा अडगळ आवरत जा, राव!
सुहास पळशीकर
बी-७०३, रोहन गरिमा,
गोखलेनगर, पुणे - ७.
फोन: ०२०-२५६३६९९५
बी-७०३, रोहन गरिमा,
गोखलेनगर, पुणे - ७.
फोन: ०२०-२५६३६९९५
No comments:
Post a Comment