Thursday, 2 March 2017

'सर्कस' म्हटली की 'रिंगमास्टर' आलाच! -- तिरकी रेघ - संजय पवार

'सर्कस' म्हटली की 'रिंगमास्टर' आलाच!

Sunday, April 27, 2014



२०१४ सालच्या लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधी सुमारे वर्षभरप्रमुख विरोधी पक्ष भाजप (मागच्या दोन निवडणुकीत पराभूत झालेलाअसल्यानेयावेळी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरला.
भाजप ज्या विचारधारेचं राजकीय अपत्य आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,संघपरिवारत्याचबरोबर कायम ठोकशाहीच्या बाजूने उभे राहणारेशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेशिवसेनाआर्थिक उदारीकरणामुळेमूळच्या मध्यमवर्गीय मानसिकतेसह नवश्रीमंत झालेला शहरी वर्ग,भारतीय सामाजिक-सांस्कृतिक विविधतेला एकाच 'वॉर्निश'खाली चमकवूपाहणारे जुने-नवे उजवे विचारवंत या सगळ्यांना इथल्या संसदीयलोकशाहीतराज्यव्यवस्थेतनिर्णयप्रक्रियेतपर्यायाने देशाच्या घटनेतकाही दोष सतत आढळत असतातपुनर्विचारपुनरावलोकनअध्ययन,चिंतन अशा विविध शब्दप्रयोगांचा वापर करून आपला मुद्दा ते मांडतअसतातरेटत असतात.
सेनाप्रमुख तर कायम लोकशाहीला 'दळभद्रीम्हणत आणि हुकूमशाही ठोकशाहीचं समर्थन करत. (कदाचित त्यामुळेच त्यांनी साऱ्या देशानेविरोध केलेल्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता.) शिवसेना हा तसास्थानिक पक्षस्वतठाकरे कधी राज्याबाहेर पडले नाहीतपणसंघपरिवाराचे तसे नाहीत्यांना भारतम्हणजेच हिंदुस्थानात हिंदू विचारन्यायचायकाँग्रेसच्या 'सर्वधर्मसमभावा'ची कायम कुचेष्टा ते विद्वेषइथपर्यंत त्यांची भूमिका राहिलीयअर्थात काँग्रेस 'प्रामाणिकनाहीपणव्यवहारी मात्र आहेत्यांनी सर्वधर्मसमभावाचा 'व्यवहारप्रामाणिकपणेटिकवला.
टिळकयुगाच्या अस्तानंतर गांधीयुगाचा आरंभत्यानंतरचे स्वातंत्र्याचेअहिंसक युद्धत्याला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसादत्याचळवळीदरम्यान गांधींनी घेतलेली अस्पृश्यताविरोधी भूमिकापुढेमुस्लिमांबाबतच्या त्यांच्या भूमिकादेशाची झालेली भौगोलिक फाळणी त्यामुळे देशाचे झालेले तुकडेत्यांना लाभलेली हिंदुस्थान-पाकिस्तान हीनावे यामुळे एक वर्ग अस्वस्थ होता'इस्लामहा त्यांचा सनातन शत्रू होता..आणि आहेहा इस्लामविरोध तीव्र करण्यास 'फाळणीवेगळ्या अर्थानेउपयोगी पडली! 

यातूनच फुल्यांनी गौरवलेला कुणब्यांचा राजा शिवाजीज्याला क्षत्रियनसल्याने राज्याभिषेक करण्यास नकार दिला होतात्याच मंडळींनी राजाशिवाजीस 'गोब्राह्मण प्रतिपालकहिंदवी स्वराज्याचा शिल्पकार बनवले.शिवाजीमहाराजांच्या वेळेस मुघल सत्ता होतीत्यामुळे ते त्यांच्याविरोधात लढलेत्यावेळी पोर्तुगीज किंवा इंग्रज असते तर त्यांच्याशीहीलढले असतेपण महाराजांची प्रतिमा 'मुस्लिमांचा कर्दनकाळअशीकरण्यात आलीत्याचवेळी टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढलाहे सोयीनेबाजूला ठेवले जाते.
या इतिहासात फार जाण्यात अर्थ नाहीमुद्दा हा आहेकी भारतालास्वातंत्र्य मिळाल्यावर भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जीसमिती नेमली गेलीत्याच्या अध्यक्षपदी डॉबाबासाहेब आंबेडकर यांचीनेमणूक झालीआज शालेय मुलालाही आंबेडकर 'फादर ऑफ कॉन्स्टिटय़ूशनम्हणून परीक्षेच्या मार्कापुरते तरी माहीत असतातस्वतंत्रभारताने संसदीय लोकशाही निवडलीसंसद सार्वभौम केली'एक माणूस-एक मतहे तत्त्व अमलात आणताना भारतीय समाजात पूर्वापार असलेलीआर्थिकसामाजिकलैंगिक विषमता दूर करून समताबंधुत्व ही तत्त्वेअंगीकारलीबाबासाहेब त्यावेळी अनेक राज्यघटनांचा जसा अभ्यास करतहोते तसाच बौद्ध धर्माचाही अभ्यास करत होतेत्यामुळे राज्यघटनेतबुद्धविचारांचा प्रभाव स्पष्ट दिसतोशिवाय चलनावरचे चार सिंह,राजमुद्रेवरचे चार सिंहझेंडय़ावरचे अशोक चक्र ही त्याची ठळक उदाहरणे.पंडित नेहरूंवरही पंचशीलाचा प्रभाव होताआजही तत्त्वज्ञानाच्याअभ्यासकांना बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञानाचा अभ्यास अनिवार्य वाटतो.
आर्याच्या आगमनानंतरच्या आणि मनुस्मृतीने विभाजित केलेल्या सनातनभारताचे विसर्जन या राज्यघटनेने केल्याने हा सनातनी वर्ग नाराज होता आहेभारताला कटाक्षाने 'हिंदुस्थानम्हणायचे आणि 'भारत हा हिंदूंचा देशआहेहीच ओळख जगाला दिसावी यासाठी हा वर्ग आग्रही असतोआणिसाधारण याच वर्गाचा गेल्या काही वर्षांपासून घटनात्मक बदल,पुनरावलोकनदुरुस्त्या यांसाठी कोपऱ्या-कोपऱ्याने प्रयत्न चालू असतो.अर्थात स्वतबाबासाहेबांनीच घटनेत आवश्यक ते बदल संसदीय मार्गानेकरण्याची सोय करून ठेवलीययातला 'संसदीय मार्गहा शब्द फारमहत्त्वाचा आहे!
आणि बाबासाहेबांनीच सांगितलं होतं की, 'योग्यमाणसांच्या हातात तीगेली नाही तर ती निरुपयोगी ठरेलकाँग्रेसने आपल्या सत्तेच्याराजकारणासाठी राज्यघटना हा सर्व दलितांसाठी 'भावनिकमुद्दा बनवला.जणू काही राज्यघटना म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेली कादंबरी आहे-ज्यात ओळीचाही बदल करणे म्हणजे त्यांचा अपमानस्वतकाँग्रेसनेचगेल्या साठ वर्षांत कितीएक घटनादुरुस्त्या केल्यात्यांचे त्यांना माहीत!
स्वातंत्र्य आंदोलनाची पाश्र्वभूमी आणि अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेलापक्षगांधीहत्येचा आणि फाळणीचा दलित-मुस्लिमांना आपल्या सत्तेसाठीएकगठ्ठा ठेवण्यासाठी खुबीने केलेला वापर यामुळे स्वातंत्र्यानंतर सलगचाळीस वर्षे काँग्रेस देशावर सुखेनैव राज्य करू शकलीदेशात  राज्या-राज्यांतहीसंघपरिवाराचा बागुलबुवा त्यांना थेट रामजन्मभूमीआंदोलनापर्यंत पुरलाबाबरी मशीद पाडली गेली आणि देशाची मानसिकफाळणी झालीयात काँग्रेसचा दलित-मुस्लीम जनाधार तुटला आणिहिंदुत्वाच्या लाटेने देश पुन्हा एकदा 'हिंदुस्थानकरण्याकडे आक्रमकप्रचार सुरू झाला.
काँग्रेसचा घटत चाललेला जनाधारगांधी घराण्याची परंपराभ्रष्टाचार,महागाई हे मुद्दे करत भाजपप्रणीत सरकार एकदा केंद्रात  नंतर अनेकराज्यांत सत्तेवर आलेपूर्ण बहुमत नाहीहा मुद्दा अधोरेखित करीतराममंदिर निर्माण३७० कलमपाकिस्तानबरोबरचे संबंध यांवर सोयीनेभूमिका बदलत भाजपने काँग्रेसला पर्याय अशी प्रतिमा उभी केली खरी;पण केंद्रात ते एकदाच सत्तेत पाच वर्षे राहू शकलेतेव्हापासून द्विपक्षीयराजवटअध्यक्षीय पद्धत यांचे गोडवे गाणे सुरू झाले आणि यंदा नरेंद्रमोदींच्या रूपाने या निवडणुकीत अध्यक्षीय पद्धतीच्या निवडणुकीचाआभास तयार करण्यात ही मंडळी यशस्वी झाली.
मोदींविरोधात राहुल गांधींची उमेदवारी जाहीर करावी यासाठी भाजपनेआव्हानेप्रतिआव्हानेउपरोधउपहासटिंगलटवाळी असे सगळे प्रकारवापरून पाहिलेपण बारा घाटाचे पाणी प्यायलेली आणि देशातल्यामोठय़ात मोठय़ा प्रदेशापासून अगदी छोटय़ा प्रदेशांतही अस्तित्वटिकवून असलेल्याशंभरी पार केलेली काँग्रेस भाजपच्या या जाळ्यातअडकणे शक्यच नव्हतेत्यामुळे आता राहुल गांधीगांधी परिवार यांचेकणकेचे प्रतिस्पर्धी उमेदवार बनवून त्यांच्याविरोधात त्यांनी युद्धपुकारलंय.
स्वातंत्र्योत्तर भारत हा महात्मा गांधींपासून पार आजच्या सोनियाराहुल,शरद पवार यांच्यापर्यंतव्हाया नेहरूपटेलडॉआंबेडकरइंदिरा गांधी,वाजपेयीअडवाणीबाळासाहेब ठाकरे ते अगदी राज ठाकरेंपर्यंत'व्यक्तिपूजकअसला तरी संसदीय लोकशाही त्याने अंगात भिनवलीय.'एक नेताएक पक्षअसे जरी तिचे स्वरूप असले तरी लोक 'पक्षमहत्त्वाचामानतात.
तसं नसतं तर आणीबाणीनंतर इंदिरा गांधींना निवडणुकीत पराभूत व्हावंलागलं नसतंनरसिंह रावांनी पाच वर्षे पूर्ण केली नसतीमायावतींचं आधीचंब्राह्मणक्षत्रियबनियाविरोधी सरकार  नंतरचं सोशल इंजिनीअरिंगयशस्वी झालं नसतंअडवाणींनी हिंदू लाट आणली तरी पंतप्रधान मात्रवाजपेयी झालेअध्यक्षीय पद्धतीत हे घडलं नसतंआणि त्यामुळेच २४-२५पक्षांचं वाजपेयींचं सरकार पाच वर्षे चाललंबाळासाहेबांचा आदेश शिरसावंद्यमानणाऱ्या दहशतीतूनही भुजबळराणेनाईक बाहेर पडलेदुसऱ्या पक्षांतजाऊन स्थिरावलेते 'एक व्यक्तीएक मतया मूलभूत मताधिकारातूनआणि संसदीय लोकशाहीमुळेचआणि याच लोकशाहीमुळे राजने 'मनसे'काढलादादरमध्ये आपले सगळे नगरसेवक पडल्याचे पाहण्याचे दुर्भाग्यसेनाप्रमुखांवर उतारवयात आलेमुलायमलालूजयललितामायावतीयांचा अतिरेक मतदार खपवून घेत नाहीतते त्यांना त्यांची जागादाखवतात.
हा देश राजेशाहीतून लोकशाहीकडे आणताना बरंच खंडन-मंडन झालंय.लोकप्रियता हा एकमेव निकष राष्ट्रप्रमुख व्हायला उपयोगी नसतोपक्ष,संसदविरोधी पक्षकायदे मंडळ आणि माध्यमे यांचं भक्कम कुंपण इथल्या'व्यवस्थे'ला जाणीवपूर्वक घालण्यात आलंयधडाकेबाज निर्णयाला'मोगलाईआणि अष्टप्रधानांच्या निर्णयाला 'शिवशाहीम्हणणारेच आताव्यक्तिपूजक 'हुकूमशाही'चे पुरस्कर्ते झालेतमिलिट्री रूल पाहिजेहिटलरपाहिजेहे म्हणणारे स्वतसिग्नल लागला तरी थांबत नाहीत आणिदलालाकडून ड्रायव्हिंग लायसन्स  पासपोर्ट बनवून घेतातहेच लोककाँग्रेसी विजयाला 'जनता मेंढरं आहेतम्हणत नाके मुरडतातआणित्यांनीच काँग्रेसला हरवलं की 'जनता प्रगल्भम्हणतातअहोआजही'बीडमध्ये मतदारांची नावे वगळलीही बातमी चार-दोन तास चालतेआणिपुण्यातील नावं वगळली तर चर्चाउपोषणेराष्ट्रपतींना निवेदन,वर्तमानपत्रांची त्यात उडी.. काय नि काययांतून कोणता वर्ग बोलकाहेकळतं ना!
अशा स्थितीत विशिष्ट वर्गाने उपरोधउपहास यांचा वापर करत भारतीयराजकारणाला सर्कशीची उपमा द्यायचीमग त्यात विदूषकी चाळे आलेतसेच ट्रॅपिझवरून पक्षबदलही आलेविविध जाती-जमातींच्या पक्षी-प्राण्यांची कसरत आलीएकदा चित्र असं उभं केलंकी 'रिंगमास्टरहीपोस्ट अनिवार्य होते.
पण भारतीय राजकारण म्हणजे केवळ सर्कस नव्हेतर इथल्याबहुसांस्कृतिकतेचे सर्व पदर एकाच ठिकाणी नांदतील असं महावस्त्र आहे.
ही बहुसांस्कृतिकता ज्यांना अडगळ वाटतेते एका प्रेषिताच्या आगमनाचीस्वप्ने पाहत राहतातत्या प्रेषिताचा रंगरूपआकारआचारविचारत्यांच्या स्वप्नात स्वच्छ आहेपण सुज्ञ भारतीय जनता इतक्यासहजासहजी या स्वप्नाला पाय ठेवायला ही भूमी देणार नाही.
शेवटची सरळ रेघ : नासाच्या संशोधकांना नव्या 'पृथ्वी'चा शोध लागल्याचीबातमी प्रसिद्ध झालीयआणि ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मग्नअसलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकर्त्यांना घाम फुटलामुळात एवढंकठीण जोडाक्षर एका दमात म्हणता येत नाहीते आणखी एक सापडलंम्हटल्यावर त्यांचा धीरच सुटला!  

No comments:

Post a Comment